पोस्ट्स

अर्थ वाणी

उत्सवाचे अर्थकारण... या वर्षातील पहिला सण तो म्हणजे "मकरसंक्रांत" या सणाच्या 14 दिवसात अनेक हातांना काम मिळते आणि नवनवीन प्रयोग केले जातात जेणेकरून नवीन व्यवसाय व उद्योग निर्माण होण्यासाठी मदत होते. काय वाटतं तुम्हाला उद्योगांना चालना देण्यासाठी सण असावेत ना. .. .. Comments box मध्ये नक्की share करा. .. . तुमची प्रतिक्रिया.. .!

सुविचार

  Knowledge-based society needs good books as well as good readers. 

डॉ. इशर... एक हिरा...!

इमेज
    डॉ. इशर जॉर्जे अहुलुवालिया या ख्यातनाम अर्थतज्ञ होत्या. या वर्षी आपण जे उत्तम हिरे गमावले त्यात हाही एक अजोड हिरा हरवला.यांनी ज्या संस्थंमध्ये काम केलं त्या संस्था आता नावाजलेल्या स्वरूपात आहेत. यांनी केलेल्या आर्थिक विचारमंथनात शहरीकरण आणि शिक्षण या दोन बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.   Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) या संस्थेच्या त्या अध्यक्ष पदी कार्यरत होत्या. १५ वर्षांचा असा प्रदीर्घ काळ त्या या संस्थेत काम करत होत्या. त्यांनी केलेल्या शिक्षण व साहित्यातील योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मॉन्टेकसिंग अहुलुवालिया यांच्या नावाचं मोठं वलय असूनही आपल्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. Industrial Growth in India: Stagnation Since the Mid-सिक्सटीएस(1986) आणि  Productivity and Growth in Indian Manufacturing (1992) हि औद्योगिक अर्थशाश्त्रातील भरीव पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  तसेच शहरीकरणावरही दोन पुस्तके लिहिली आहेत. ती म्हणजे  Transforming our Citie...

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)

इमेज
  पर्यटन उद्योजकता - कास  विकासाची (2) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो.  ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.  अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो...
 "स्त्री जन्माचं स्वागत करूया...!"      "तूच दंडदुत, तूच न्यायाधीश आणि तूच वधक"  असा व्यापक प्रश्न घेऊनच का होईना पण स्त्री जन्माचं स्वागत करायला हवंय...तेही धाडसानं! थोडा बिनधास्तपणा वाढला आहे स्त्रियांचा. म्हणूनच प्रश्न हा आहे कि असं कश्यासाठी सांगावं लागत. का म्हणून हि स्वतंत्र उखळ करून द्यायची? प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाची जाणीव स्वतः ठेवायला हवी. यासाठी केवळ आणि केवळ संस्कृती कारणीभूत नाही तर आपल्यातला मागासलेपणा कारणीभूत आहे असे मला वाटते.   स्त्री म्हणजे वात्सल्य , ममता आणि करुणेचा महासागरच! स्त्री हि जन्मत:च त्याग सहनशीलता आणि संयम याचे मूर्तिमंत प्रतिक आहे. १९व्या शतकात बुरखा काढून स्त्रियांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, २० व्या शतकात कार्याश्मता वाढवली आणि २१ व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.      पुरुषसत्ताक संस्कृतीच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व मान्य करणाऱ्या स्त्रिया आजही आदर्श म्हणून गौरविल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, पतीने त्याग केला तरीसुद्धा 'ब्र' न काढणारी सोसीक वसुंधरापूत्री सीता , नवरा आंधळा आहे म्...

खुणावणऱ्या बाजारपेठा

  काही वेळा तर खास ठिकाणी बाजारपेठ नव्याने तयार करून सजवल्या जातात. भिन्न प्रकारच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्कॉउंटचा वर्षाव केला जातो. भारतात आणेल परंपरा आणि प्रादेशिक रूढी पूर्वापार चालत आल्या  आहेत. त्यामुळे भारतात  सांस्कृतिक आणि धार्मिक रूढींना एक महत्त्वाचे स्थान आहे .  त्यामुळे  अर्थव्यवस्थेत  रॊजगार  निर्मितीचे  एक महत्त्वाचे मध्यम म्हणून उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना सनांचे व उत्सवांचे अर्थकारण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंगभूत घटक आहे असेच म्हणावे लागेल. भारतात संस्कुतिक आणि धर्मिक रूढींना देशाच्या राज्यघटनेने मान्यता दिली आहे. भारतात राज्यसभेने ५१ उत्सवांना मान्यता दिली आहे त्यातील  उत्सव  हे राष्ट्रीय सन म्हणून आनंदाने आणि  उत्साहाने साजरे केले जातात. आपल्याकडे रूढी आणि परंपरा आणि वारसाने चालत आलेल्या अनेक गोष्टींना अप्रत्यक्ष लोकमान्यता आहे. हि लोकमान्यताच आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवत असतात . अशा वातावरणात अनेक उत्सवांमध्ये घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते हे निरनिराळ्या माध्यमातून ग्राहकांच्या प...

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (भाग २)

इमेज
 पर्यटन उद्योजकता - कास  विकासाची (भाग २) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो.   ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.   अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला...

पर्यटन उद्योजकता : कास विकासाची (भाग १)

इमेज
  पर्यटन उद्योजकता :- कास  विकासाची  पर्यटन उद्योजकता - कास    विकासाची       पर्यटनाला जवळच्या शब्द शोधायला गेले की मुशफिरी भटकंती अनवट वाटा पायवाटा शोधणे, जंगल सफारी, गड किल्ल्यांची भेट, निसर्गरम्य प्रवासी सफरी  व प्रेक्षणिय ठिकाण अशा अनेक शब्दांनी मनात गर्दी करायला सुरुवात केली . छंद, आवड, फुरसत म्हणून पर्यटनाला जाणे हे आजकाल नवीन आहे का? मुळीच नाही. पण असा साधा सरळ भटकायला प्रेरित करायला करणारा प्रवास आपल्याला जर आर्थिक गणितात बसवायचा झाल्यास विचार करायला हवा …! अगदी बरोबर ओळखलत...! देशाच्या संपन्न समृद्ध असलेल्या अशा प्रेक्षणीय स्थळांना पर्यटन म्हणून लौकिक मिळायला हवा.  आज २७ जुलै जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्ताने थोडेसे जाणून घेऊ भारतीय पर्यटनाविषयी...       ज्या पर्यटन स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे त्या स्थळांचा छोटासा अभ्यास विचार करू इच्छिते. भारताचा विचार केला तर प्राचीन शिल्पकला, स्थापत्य यांनी ओतप्रोत भरलेली आकर्षक  मंदिरे आहेत. बौद्ध व जैन संस्कृतीच्या खाणाखुणा दाखवणाऱ्या अनेक दु...

कृषी पर्यटन

शाश्वत विकास      खेड्याचे विस्तारीकरण झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळते.  धकाधकीचे जीवन आणि वाढते "शहरीकरणामुळे"  लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. ग्रामीण जीवनपद्धतीचा विसर पडू नये म्हणून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून  हि जीवन शैली अनुभवने आनंददायी आहे.  यामुळेच आजकाल कृषी पर्यटन पर्यटकांना  आकर्षित करून घेते.  शाश्वत विकासासाठी असा विकास आवश्यकच मानावा नाहीतर खेडी सुधारणार नाहीत. आपल्या सर्व जुन्या संकल्पना , रीती, जगण्याच्या पद्धती आणि समृद्ध वारसा तसेच वास्तुशिल्पानाही आपल्या गावात स्थान द्यावे, त्याचे जतन करावे व तो वारसा तसाच पुढच्या पिढीकडे सुरक्षित रित्या सोपवावा. जेणेकरून त्या पिढीला त्याचा लाभ झाला पाहिजे तेव्हाच तर आपण याला शाश्वत विकास म्हणू.   आपली या क्षेत्रातील मते / अभिक्रिया जरूर  कळवा.  ______ डॉ. माधुरी वर्तले 

Economic Thought

  “The ideas of economists and political philosophers, both when they are right and when they are wrong are more powerful than is commonly understood. Indeed, the world is ruled by little else. Practical men, who believe themselves to be quite exempt from any intellectual influences, are usually slaves of some defunct economist.” ―  John Maynard Keynes

भारतातील महिला अर्थतज्ञ...

इमेज
 भारतातील महिला अर्थतज्ञ... भारतात अनेक जणांनी केवळ त्याचा विकास व्हावा या साठी सदैव  झटत राहणारे विचारवंत आपल्याला प्रत्येक राज्यांत दिसतात. स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्याचे काम केले. भारताला स्वयंपूर्ण करून आता आत्मनिर्भर कडे वाटचाल असा प्रवास करत असताना कित्येक थोर लाधेले , जिंकले, सामाजिक जळमटे दूर करून नवी दिशा दाखविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. यामध्ये काही वेळा महिलांनीही आपला सहभाग दाखविला, दिलेल्या जबाबदार्या पार पाडल्या . भारताला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठीच प्रत्येक जण धडपडत होता. कोणताही मार्ग सुकर कधीच नसतो, अनेक अडथळे पार करून तो गाठावा लागतो, त्याप्रमाणे अनेक जण वैचारिक घडी बसविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच आपण आजचा समृद्ध भारत बघतोय. बरोबर न...  भारतात आजपर्यंत ज्या महिला अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊ थोडेसे... किती जण आहेत माहित आहे का?... असल्यास आठवा ...तोपर्यंत मी फोटो पाठवते तुमच्यासाठी ... पहा बर...पटते  का ओळख....? पद्मभूषण , देवकी जैन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पुढील लेखात ... 

आर्थिक संकटात शोधा नव्या संधी ...!

इमेज
 देशात सर्वत्र कोविड -१९ या महामारीने हैराण केले असताना हा लेख प्रपंच करण म्हणजे माझ्यातील अभ्यासकाला जे दिसतंय हे तुम्हा सर्वाना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न .... परवा  झाले असे  की,  माझी मुलगी youtube वर गोष्टी बघत बसली होती. त्या गोष्टीतील एक लहान मुलगा फक्त डोसाच खात असतो ....नाही केला तर उपाशी राहतो ...यामुळे आपल्या मुलाला चांगले दिले पाहिजे या विचाराने त्याची आई त्याला सर्व भाज्यांचे डोसे बनऊन देते. असे करत करत तो मोठा होतो. अभ्यासात जेमतेम असतो त्यामुळे पुढे नोकरी शोधायला जातो तेव्हा त्याचे मित्रं मोठ्या पदावर गेलेले असतात आणि त्याची गंमत करतात. त्याला चिडवतात, त्यमुळे तो नाराज होऊन घरी येतो. खिन्न आणि चिंताग्रस्त मुलाला आई विचारते की काय झाले? त्यावेळी तो घडलेला प्रकार आईला सांगतो .... मग त्याच्या डोक्यात कल्पना येते कि , छोट्याश्या हातगाडीवर डोसा तयार करायचा आणि तो विकून स्वताच्या पायावर उभे राहायचे आणि हसणाऱ्या त्याच्या मित्रांना उत्तर द्यायचे . ते हि आपल्या कामातून ... तो उद्योग सुरु करतो, इतक्या विविध प्रकारचे डोसे बनवू लागतो कि ज्यामुळे काही वर्षत तो चा...

अर्थवाणी

कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद देशाचे नागरिक आम्ही...  ही एक हकीकत आहे. भारतीय नागरिक म्हणून काम केले आहे. जे की स्वत:ला बंद करून घरात कोणत्यातरी कामात व्यस्त राहणं... किती कठीण असते... आपण तसंही रोज काम करतोच ना मग कोरोना मुळे घरी राहणं अवघड का होत आहे... मला वाटतं त्यासाठी दोन कारणं असावीत, एक स्वत: व्यस्त कसे रहावे हे कळत पण वळत नाही. दुसरे म्हणजे काय फरक पडतो? अशी वृत्ती आपल्याला कामापासून दूर नेते. आपण सामाजिक वृत्तीचे असल्याने असं एकटं राहणं अवघड होते. हे खरं तर वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाचे वाटत असले तरीही आता हे चालणार नाही... देशातील कामगार देशोधडीला लागलेत.      उत्पादन ठप्प झाले आहे.  मायदेशी परतणारे , पायी जाणारे कामगार निष्कारण अपघाती गेले. हि हळहळ देशभरात सर्वत्र दिसली. मनात  असं वाटून गेलं ; बर झालं आपण यात नाही. आपल्याला जागेवर पुरेसा अन्न आणि निवारा आहे. हेच  खूप  आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी काळोखात गडप होऊन निद्रिस्त झाल्यासारखं वाटते. काहींना प्रश्न आहे इतका वेळ मिळतो आहे त्याच काय करायचं...मुलांना तर...

Arthvani: अर्थवाणी

Arthvani: अर्थवाणी : सागरी/ नील  अर्थशास्त्र              भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र वेढलेला आहे. खरं तर satellite view वरून नितळ,  अथांग, नितांत सुंदर दि...

अर्थ वाणी

माझ्या मनात अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वांना जागरूक केले पाहिजे असा विचार वारंवार येत आहे, यासाठी विविध प्रकारची माहिती संकलित करून आपल्या मनात निर्माण होत असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून या ब्लॉग वर येण्यास या वर्षी योजलेले पहिलेच पाऊल...!          आशा आहे आपण नक्कीच चांगले विचार  करायला सुरुवात करू. अर्थ वाणी रूजवू.....😊👍✨ नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!