पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)
पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो. ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते. अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो...