"स्त्री जन्माचं स्वागत करूया...!"
"तूच दंडदुत, तूच न्यायाधीश आणि तूच वधक" असा व्यापक प्रश्न घेऊनच का होईना पण स्त्री जन्माचं स्वागत करायला हवंय...तेही धाडसानं! थोडा बिनधास्तपणा वाढला आहे स्त्रियांचा. म्हणूनच प्रश्न हा आहे कि असं कश्यासाठी सांगावं लागत. का म्हणून हि स्वतंत्र उखळ करून द्यायची? प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाची जाणीव स्वतः ठेवायला हवी. यासाठी केवळ आणि केवळ संस्कृती कारणीभूत नाही तर आपल्यातला मागासलेपणा कारणीभूत आहे असे मला वाटते.
स्त्री म्हणजे वात्सल्य , ममता आणि करुणेचा महासागरच! स्त्री हि जन्मत:च त्याग सहनशीलता आणि संयम याचे मूर्तिमंत प्रतिक आहे. १९व्या शतकात बुरखा काढून स्त्रियांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, २० व्या शतकात कार्याश्मता वाढवली आणि २१ व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.
पुरुषसत्ताक संस्कृतीच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व मान्य करणाऱ्या स्त्रिया आजही आदर्श म्हणून गौरविल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, पतीने त्याग केला तरीसुद्धा 'ब्र' न काढणारी सोसीक वसुंधरापूत्री सीता , नवरा आंधळा आहे म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून जगाचा अनुभव नाकारणारी गांधारी, पतीसेवापरायण सत्यभामा, पतीचे गेलेले प्राण परत मिळविणारी पतिव्रता सावित्री, नवऱ्याने दारू पिऊन मारझोड केली तरी ' कशी या त्यजू पदाला' म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ. अशी न संपणारी आदर्श उदाहरणे भारतात आहेत. स्त्रियांना दुय्यम स्थान का देतात याची दोन कारणं असावीत असं मला वाटते. एकतर असुरक्षितेची भावना आणि दुसरं म्हणजे 'स्व'त्वं काय आहे याची जाणीव नसणे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगात चीनचा लोकसंख्या वाढीमध्ये प्रथम आणि भारताचा दुसरा क्रमांक आहे. यापैकी केवळ ३०-४० टक्के लोकसंख्या शहरात राहते आणि २०-२५ टक्के लोकसंख्या झोपडीत राहते अजूनही . दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिंग गुणोत्तर (दर हजार पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण) हे प्रमाण राज्यनिहाय वेगवेगळे आहे किंबहुना त्याहून कमी आहे.याच गांभीर्य कधी येणार आहे आपल्याला? मनुष्यनिर्मितीच जिच्यामुळे होते तिचं या व्यवस्थेत किती महत्त्व आहे याचा विचार ह्वायालाच हवा. आता तरी जागे व्हा.सामाजिक स्वास्थ्य संतुलित करण्यासाठी सज्ज होऊयात.
शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या की शुद्ध विचार जन्माला येतात. यासाठी स्वत:चा निर्धार पक्का लागतो.स्त्री शिक्षण अंत्यत गरजेची बाब आहे.
बरे झाले देवा। केलासी उपकार
घातलेस जन्मा। बाईच्या ह्या
न कळे कोणा। अर्थ बोलण्याचा
भाषेनेही मुके । केले आम्हा।।
टिप्पण्या