पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)
पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)
भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो. ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते. अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
` सरकारमार्फत ‘देखो अपणा देश’ या थीमवर आधारित या वर्षी पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला भारताचे बहुविकल्पीय सांस्कृतिक वारसा आणि सुंदरता पाहण्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करता येईल. म्हणूनच यंदा हे बोधवाक्य करण्यात आले. पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. जगभरात जशी रसायन इंधन याला प्राथमिकता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे पर्यटनाला देखील व्यापक स्वरूपाचा व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. पर्यटन विकासामुळे देशातील रोजगार सुधारण्यास मदत होते. पर्यटनाबाबत विचार मांडताना खाद्यसंस्कृती, पारंपारिक कला, साहित्य, लोकजीवन आणि नैसर्गिक सौंदर्य या गोष्टींचा विचार आवर्जून होतो. सांस्कृतिक आदानप्रदान मुळे त्या त्या ठिकाणचे वैशिष्ट्य जाणून घ्यायला मदत होते. चांगले लोकजीवन पद्धतीचा अभ्यास करता येतो.
एक वेगळा जीवनानुभव उपभोगता येतो. पर्यटन विकासामुळे पायाभूत विकास होतो. राष्ट्रीय महामार्ग विकसित करायला वाव मिळतो. महामार्ग जोडलेले की रोजगाराच्या नव्या संधी सहज उपलब्ध होण्यास मदत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिक व मुंबई महामार्ग जोडल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकच्या पर्यटनाला निश्चित त्याचा आर्थिक फायदा झाला आहे. पर्यायाने संपूर्ण जिल्ह्याला याचा सर्वांगीण फायदा होतो. पर्यटनाला केंद्रबिंदू मानून त्या प्रमाणात गरजेनुसार सेवा सुविधा पुरवण्यास पर्यटन विकास विकासाला आर्थिक चालना मिळते. जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव तालीम यांनी एक सुंदर संदेश दिला आहे, ‘निसर्ग संस्कृती आणि यजमान यांचा सन्मान करा तुम्ही अधिक चांगल्या विश्वाचे दूत बनू शकता.’ म्हणूनच भारतात “पधारो मारे देश” हे लोकप्रिय गीत कि जे आपल्याला आजही राजस्थानात गेल्यावर ऐकायला मिळते. ज्या-ज्या पर्यटन स्थळांमध्ये पर्यटकांची वर्दळ आहे त्या-त्या ठिकाणच्या लोकांनी पर्यटकांचे स्वागत, अगत- भगत करणे, त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. पर्यटकांना मध्याबिंडी मानून मूलभूत सेवा-सुविधा पुरविल्यास पर्यटन क्षेत्रातील वाढीला अपेक्षित आर्थिक विकास शक्य आहे.
या अनुषंगाने आपण खालील मुद्द्यांवर विचार करूयात ज्यामध्ये मार्केटिंग खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेने पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत.
मार्केटिंग
पाश्चात्य देशात राष्ट्रांनी परंपरेच्या खुणा वारसा वास्तू दिमाखदार पद्धतीने जपल्या आहेत आणि त्याचं ते चांगल्या प्रकारे मार्केटिंग करतात. त्याचा फायदा त्यांना होतो. आपणही आपल्या देशातील ऐतिहासिक संग्रहालय भौगोलिक नैसर्गिक देखावे, स्थापत्य, लेण्यांमध्ये कोरलेली शिल्प, हस्तकला, साहित्यिक वारसा, लोक जीवन पद्धती याची जपणूक करत त्याचे मार्केटिंग आणि व्यावसायीकरण करायला हवे.
रोजगाराच्या संधी
पर्यटनामुळे वाहतूक दळणवळण सेवा पुरविणाऱ्या वाहन व्यवस्थांचा विकास होतो. वाहनांची सोय झाली की पर्यटनाला अधिक चालना मिळते. पर्यटनाला चालना मिळाली की तेथे उपलब्ध असणाऱ्या भोजन व्यवस्था हॉटेल्स निवासी किंवा विश्राम स्थळांची व्यवस्थापनामध्ये बदल घडून येतो. वेगवेगळे चविष्ट रुचकर पदार्थांची मागणी वाढते. शिवाय पर्यटनातून मनोरंजन व सफारी अशी दुहेरी परवणी मिळते. एकूणच क्षेत्रीय विकास घडत असताना हॉटेल, दळणवळण, मनोरंजन आणि काही मूलभूत सेवा-सुविधा त्यातून रोजगारनिर्मिती सहजी शक्य होतो. पर्यटनातून कुशल-अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना काम मिळते.
भारताला मिळणाऱ्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापैकी चार टक्के वाटा हा पर्यटन क्षेत्राचा
आहे. भारतात येणार्या विदेशी पर्यटकांची संख्या एकूण पर्यटकांच्या सर्वसाधारणपणे पन्नास
टक्के आहे.पर्यटन व्यवस्थापनाद्वारे क्षण देशीय रोजगार वाढीस मदत होऊ शकते. पर्यटन
व्यवसायाचे सामाजिक तथा आर्थिक फायदे अर्थव्यवस्थेला क्षेत्रीय लाभ तथा आर्थिक
मिळवून देण्यात सक्षम आहेत. हीच क्षमता ओळखून त्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करणे
गरजेचे आहे. प्रस्थापित होणारे उद्योग की ज्यामध्ये आपण कृषी पर्यटन पाहू.
कृषी पर्यटन :-
टिप्पण्या