पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (भाग २)

इमेज
 पर्यटन उद्योजकता - कास  विकासाची (भाग २) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो.   ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.   अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला...

पर्यटन उद्योजकता : कास विकासाची (भाग १)

इमेज
  पर्यटन उद्योजकता :- कास  विकासाची  पर्यटन उद्योजकता - कास    विकासाची       पर्यटनाला जवळच्या शब्द शोधायला गेले की मुशफिरी भटकंती अनवट वाटा पायवाटा शोधणे, जंगल सफारी, गड किल्ल्यांची भेट, निसर्गरम्य प्रवासी सफरी  व प्रेक्षणिय ठिकाण अशा अनेक शब्दांनी मनात गर्दी करायला सुरुवात केली . छंद, आवड, फुरसत म्हणून पर्यटनाला जाणे हे आजकाल नवीन आहे का? मुळीच नाही. पण असा साधा सरळ भटकायला प्रेरित करायला करणारा प्रवास आपल्याला जर आर्थिक गणितात बसवायचा झाल्यास विचार करायला हवा …! अगदी बरोबर ओळखलत...! देशाच्या संपन्न समृद्ध असलेल्या अशा प्रेक्षणीय स्थळांना पर्यटन म्हणून लौकिक मिळायला हवा.  आज २७ जुलै जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्ताने थोडेसे जाणून घेऊ भारतीय पर्यटनाविषयी...       ज्या पर्यटन स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे त्या स्थळांचा छोटासा अभ्यास विचार करू इच्छिते. भारताचा विचार केला तर प्राचीन शिल्पकला, स्थापत्य यांनी ओतप्रोत भरलेली आकर्षक  मंदिरे आहेत. बौद्ध व जैन संस्कृतीच्या खाणाखुणा दाखवणाऱ्या अनेक दु...

कृषी पर्यटन

शाश्वत विकास      खेड्याचे विस्तारीकरण झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळते.  धकाधकीचे जीवन आणि वाढते "शहरीकरणामुळे"  लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. ग्रामीण जीवनपद्धतीचा विसर पडू नये म्हणून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून  हि जीवन शैली अनुभवने आनंददायी आहे.  यामुळेच आजकाल कृषी पर्यटन पर्यटकांना  आकर्षित करून घेते.  शाश्वत विकासासाठी असा विकास आवश्यकच मानावा नाहीतर खेडी सुधारणार नाहीत. आपल्या सर्व जुन्या संकल्पना , रीती, जगण्याच्या पद्धती आणि समृद्ध वारसा तसेच वास्तुशिल्पानाही आपल्या गावात स्थान द्यावे, त्याचे जतन करावे व तो वारसा तसाच पुढच्या पिढीकडे सुरक्षित रित्या सोपवावा. जेणेकरून त्या पिढीला त्याचा लाभ झाला पाहिजे तेव्हाच तर आपण याला शाश्वत विकास म्हणू.   आपली या क्षेत्रातील मते / अभिक्रिया जरूर  कळवा.  ______ डॉ. माधुरी वर्तले 

Economic Thought

  “The ideas of economists and political philosophers, both when they are right and when they are wrong are more powerful than is commonly understood. Indeed, the world is ruled by little else. Practical men, who believe themselves to be quite exempt from any intellectual influences, are usually slaves of some defunct economist.” ―  John Maynard Keynes