खुणावणऱ्या बाजारपेठा
काही वेळा तर खास ठिकाणी बाजारपेठ नव्याने तयार करून सजवल्या जातात. भिन्न प्रकारच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्कॉउंटचा वर्षाव केला जातो. भारतात आणेल परंपरा आणि प्रादेशिक रूढी पूर्वापार चालत आल्या आहेत. त्यामुळे भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक रूढींना एक महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत रॊजगार निर्मितीचे एक महत्त्वाचे मध्यम म्हणून उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना सनांचे व उत्सवांचे अर्थकारण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंगभूत घटक आहे असेच म्हणावे लागेल. भारतात संस्कुतिक आणि धर्मिक रूढींना देशाच्या राज्यघटनेने मान्यता दिली आहे. भारतात राज्यसभेने ५१ उत्सवांना मान्यता दिली आहे त्यातील उत्सव हे राष्ट्रीय सन म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आपल्याकडे रूढी आणि परंपरा आणि वारसाने चालत आलेल्या अनेक गोष्टींना अप्रत्यक्ष लोकमान्यता आहे. हि लोकमान्यताच आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवत असतात . अशा वातावरणात अनेक उत्सवांमध्ये घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते हे निरनिराळ्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. उत्सवांमुळे एकत्र आल्याने बंधुभाव निर्माण होतो. अशा प्रकारच्या वातावरणात बाजारपेठांना देखील चांगले व्यावसायिक वातावरण लाभते. त्यातूनच नवनिर्मितीला चालना मिळते .
नवनिर्मिती म्हटलं की ज्ञान आणि विज्ञान यांचा संगम असतो. भारतात नवतंत्रज्ञानाचे आणि विकासाचे वारे वाहत आहेत. म्हणून सध्या भारत गतिशील अर्थव्यवस्थेकडे वळत आहे. यात माहिती – तंत्रज्ञान क्षेत्राचा वाट मोठा आहे. नव्याने विकसित झालेले आणि फोपावलेले ई कॉमर्स चे जाळे बाजारपेठांची दिशा आणि दश बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. सन उत्सव आले की या ई-कॉमर्सच्याआधारे संगणक वापरताना आधुनिक वस्तूंकडे आकर्षित केले जाते. त्यासाठी भरघोस डिस्काउंट आणि मुबलक ऑफर्स दिल्या जातात . आमझोन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईट फेस्टिवल कार्निवल साजरे करतात म्हणजे वस्तू माफक किंमतीत तत्पर उपलब्ध करून दिल्या जातात. तत्पर ग्राहक सेवेमुळे या दोन्ही कंपन्यांनी पूर्वीपेक्षा जास्त पसंती मिळवली आहे. अशा तऱ्हेने ई कॉमर्स चे विकसित बाजाराचे प्रारूप घडत आहे. अशा नव्या पद्धतीने विकसित होणारे व्यापारही धार्मिक सणांवर विशेष नजर ठेवून असतात.
भारतात सुमारे २.१ मिलियन्स किंवा त्याहून अधिक मंदिरे असावीत असा अंदाज बांधला जातो. त्या सर्व मंदिरांना लागणारे पूजा साहित्य , इतर कार्यक्रम , अनेक सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उत्सव याकरिता अनेकदा आर्थिक निकष महत्वाचे ठरतात. आपण उदाहरणाकरिता केवळ महाराष्ट्र पुरता मर्यादित विचार करूयात. गणेश चतुर्थी हा आपल्याकडे मोठ्या दिमाखात साजरा होणारा उत्सव आहे. या सणात कितीतरी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली जाते. अनेक प्रकारचे उद्योग निर्मिती आणि रोजगार निर्मिती या निमित्ताने घडून य्रतात. दारिद्र्य आणि बेकारी या दोन गंभीर समस्या आपल्या देशासमोर आहेत. आजही कित्येक हात काम शोधण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतात.
गणेश चतुर्थी मध्ये दहा दिवसात अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध होतात. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हे रोजगार उपलब्ध होतात. आपल्याकडे गणेश चतुर्थी तशी पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा पूजा उत्तरेत गंगा पूजा दक्षिणेत ओणम, पंजाबात बैसाखी गुजरात मध्ये रक्षाबंधन व पतंगोत्सव बिहार, मध्यप्रदेश मध्ये दिवाळी, अशा अनेक सणांची मोठी रीघ च आपल्याकडे आहे. त्यांमुळे अनेक हातांना रोजगार मिळतो. देशात धार्मिक कार्यात होणारी उलाढाल मोठी आहे. गणेश उत्सवात गणेश मूर्ती तर दुर्गा पूजेत दुर्गा मूर्ती तयार करण्यासाठी उत्तम कारागिरांची आवश्यकता असते. यातून अनेक कौशल्यपूर्ण कारागीर व कलावंत तयार होतात. गुजरात मध्ये तयार केल्या जाणार्या राख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान टिकवून आहेत. राख्यांच्य विविधीकारणात जगात गुजरात चा हात कुणीच धरू शकत नाही. या काळात जवळजवळ ४०० ते ५०० कोटी रुपयांचा व्यापार होतो. या व्यापारात प्रवीण असणार्या ४००० ते ५००० कुटुंबांना रोजगार मिळतो. उत्तरांचल, दिल्ली, राजस्थान मध्ये साजरा होणारा पतंगोत्सव हा भारतातील असामान्य कौशाल्ल्याला साजेसा असाच आहे. जानेवारीत पार पडणाऱ्या या पतंगोत्सवामध्ये अनेक बड्या कंपन्या बह्न्द्वालदार व गुंतवण्य्कदार पतन्गोत्सावाची जय्यत तयारी करून नवनिर्मिती व स्पर्धा भरवतात. या उत्सवातही स्दाहाराणपणे ५०० तर ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असावी . हे रोजगार हंगामी स्वरूपाचे असतात. २०११ च्या अहवालानुसार देशात एकूण ४.६ कोटी लोकांनी म्हणजेच १०.२२ % लोकांनी केवळ कामासाठी स्थलांतर केले आहे. अशी परिस्थिती असली तरी सणांमध्ये बाजारपेठेत नवनवीन वस्तूंची निर्मिती सातात्याने होत असते. गुढी पडावा , दासर, दिवाळी, अक्षय तृतीय यांसारख्या मुहुर्तांवर वाहन खरेदी करण्याची पद्धती रूढ झाली आहे. त्या शिवाय इतर ग्राहक उपयोगी वस्तूंमध्ये वाशिंग मशिन, कूलर, रेफ्रिजरेटर इत्यादी वस्तूंची खरेदी होते.
यामुळे रोजगार वाढीला चालना मिळते. सध्याच्या ऑनलाइन ट्रेडिंग मुळे ग्राहक विक्रेते यांमध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो. निवड स्वातंत्र्य आणि किंमत न ठरविता आहे त्या किमतीला वस्तू खरेदी करण्याचा भारतीयांचा कल वाढत आहे. ई- ट्रेडिंगमुळे आपल्याला बसल्या जागी कमी वेळेत खरेदीचा आनंद घेता येतो.
ई कॉमर्समुळे ग्राहक क्षमता निश्चित करणे बड्या कंपन्यांना सहज शक्य झाले आहे.
प्रीबुकिंग सुविधांमुळे नफ्याचे उपयोजन करता येते.
वस्तू व सेवांमधील तांत्रिक बदल सहज पाने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे सामाजिक माध्यमांमुळे सहज शक्य होती आहे.
चोखंदळ ग्राहक पेठ निर्माण होण्यास मदत होत आहे.
नवनिर्मितीला वेग मिळत आहे. अर्थार्जन व अर्थ नीती याने अर्थिक गुणवत्ता वाढीस लागत आहे. नवीन रोजगार संधी उपलब्ध होत आहे.
पर्यटन हॉटेल व्यावसायिक आणि संलग्न व्यवसाय विकसित होत आहे.
टिप्पण्या