"स्त्री जन्माचं स्वागत करूया...!" "तूच दंडदुत, तूच न्यायाधीश आणि तूच वधक" असा व्यापक प्रश्न घेऊनच का होईना पण स्त्री जन्माचं स्वागत करायला हवंय...तेही धाडसानं! थोडा बिनधास्तपणा वाढला आहे स्त्रियांचा. म्हणूनच प्रश्न हा आहे कि असं कश्यासाठी सांगावं लागत. का म्हणून हि स्वतंत्र उखळ करून द्यायची? प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाची जाणीव स्वतः ठेवायला हवी. यासाठी केवळ आणि केवळ संस्कृती कारणीभूत नाही तर आपल्यातला मागासलेपणा कारणीभूत आहे असे मला वाटते. स्त्री म्हणजे वात्सल्य , ममता आणि करुणेचा महासागरच! स्त्री हि जन्मत:च त्याग सहनशीलता आणि संयम याचे मूर्तिमंत प्रतिक आहे. १९व्या शतकात बुरखा काढून स्त्रियांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, २० व्या शतकात कार्याश्मता वाढवली आणि २१ व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. पुरुषसत्ताक संस्कृतीच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व मान्य करणाऱ्या स्त्रिया आजही आदर्श म्हणून गौरविल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, पतीने त्याग केला तरीसुद्धा 'ब्र' न काढणारी सोसीक वसुंधरापूत्री सीता , नवरा आंधळा आहे म्...
टिप्पण्या