अर्थवाणी
कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद देशाचे नागरिक आम्ही...
ही एक हकीकत आहे. भारतीय नागरिक म्हणून काम केले आहे. जे की स्वत:ला बंद करून घरात कोणत्यातरी कामात व्यस्त राहणं... किती कठीण असते... आपण तसंही रोज काम करतोच ना मग कोरोना मुळे घरी राहणं अवघड का होत आहे... मला वाटतं त्यासाठी दोन कारणं असावीत, एक स्वत: व्यस्त कसे रहावे हे कळत पण वळत नाही. दुसरे म्हणजे काय फरक पडतो? अशी वृत्ती आपल्याला कामापासून दूर नेते. आपण सामाजिक वृत्तीचे असल्याने असं एकटं राहणं अवघड होते. हे खरं तर वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाचे वाटत असले तरीही आता हे चालणार नाही... देशातील कामगार देशोधडीला लागलेत.
उत्पादन ठप्प झाले आहे. मायदेशी परतणारे , पायी जाणारे कामगार निष्कारण अपघाती गेले. हि हळहळ देशभरात सर्वत्र दिसली. मनात असं वाटून गेलं ; बर झालं आपण यात नाही. आपल्याला जागेवर पुरेसा
अन्न आणि निवारा आहे. हेच खूप आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी काळोखात गडप होऊन निद्रिस्त झाल्यासारखं वाटते. काहींना प्रश्न आहे इतका वेळ मिळतो आहे त्याच काय करायचं...मुलांना तर खूप आनंद झाला आहे अभ्यास नाहीं म्हट्ल तरी आहे दिवसातून १ तास ....टांगल -मंगल करीत मजेत पूर्ण करतात .... महिलांना तर काम वाढली आहेत.
Work From Home मुळे अनेकांचा वेळ सत्कारणी लागला... अनेकांनी लेखन प्रपंच केले, कविता केल्या, खुपसारे व्हिडिओस बनविले, स्वयंपाक न येणाऱ्यांनी चविष्ट पदार्थ केले, आजी आजोबांची मात्र थोडी का भरपूर खोटी झाली त्यांना बाहेर काही जात येईना; चांगलीच पंचायत होऊन बसली...असो, अशी बंद देशाची कहाणी ...बऱ्याच ठिकाणी हानी करत आहे तर काही ठिकाणी आनंद देत आहे. अर्थव्यवस्था मात्र वेठीस टांगली आहे... उद्योग बंद....हाताचे काम बंद.... बँक चालू असूनही व्यवहार बंद.....कर्जाची मागणी बंद... गुंतवणूक बंद... नवीन काही तयार होईना... अनेक लोकांचे ऑपरेशन्स बंद...नवीन वाहनांची खरेदी बंद... सामाजिक कार्य बंद....समारंभ बंद....उत्सव बंद ... देऊळ, मश्चिद , चर्च , गुरुद्वारा हेही बंद.... दुकाने बंद....नवीन उपक्रमशीलता बंद ...कोणाच्याही घरी जाणं बंद... कोणालाही घरी बोलावणं बंद....सगळंच कस बंदच बंद....काही आणायला गेलं कि रांगच रांगा....काय करायचं कोणीतरी सांगा....!
टिप्पण्या
असेच लिहित रहा