पर्यटन उद्योजकता : कास विकासाची (भाग १)
पर्यटन उद्योजकता - कास विकासाची
ज्या पर्यटन स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे त्या स्थळांचा छोटासा अभ्यास विचार करू इच्छिते. भारताचा विचार केला तर प्राचीन शिल्पकला, स्थापत्य यांनी ओतप्रोत भरलेली आकर्षक मंदिरे आहेत. बौद्ध व जैन संस्कृतीच्या खाणाखुणा दाखवणाऱ्या अनेक दुर्मिळ गुहा आहेत. प्राचीन लेणी व मानव निर्मित वैभवाच्या खुणा दाखवणारे महान महाल आपले मन मोहून टाकतात. भारतात सत्ता गाजवलेले अनेक राजे , त्यांची स्मारके, राजवाडे अजोड वास्तुशिल्पे मनोरे आपले लक्ष सहज वेधून घेतात. असा वैदिक खानाखुनांपासून ते मुघलसाम्राज्य आणि मुघलांपासून ते पेशव्यांपर्यंतच्या सांस्कृतिक वास्तूंचा अनेक मानवनिर्मित कलाकुसरी आजही पर्यटकांना आकर्षित करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील एकूण पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे हेच सिद्ध् होते.
भारतात पर्यटनाची अगणित स्थळे आपल्याला खुणावताहेत. याचा थोडा जरी आर्थिक बाजूने विचार केला तर प्रमाणित करता येईल अशी अनेक पर्यटन स्थळे आपल्याला देशाचे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढवून देऊ शकतात. यावर मी लक्ष वेधू इच्छिते. भारतावर निसर्गानेच एक जादूई किमया केलेली आहे. ज्यायोगे आपल्या देशातील प्रत्येक राज्य वेगवेगळ्या वातावरणासाठी संपन्न प्रादेशिक खाणाखुणा आणि वारसा स्थळे यांनी संपन्न झाले आहे. आग्राचा ताजमहाल, हम्पी, धार्मिक स्थळे, हिमालयातील डोंगररांगा, जम्मू काश्मीर, उटी सारखी थंड हवेची ठिकाणे, महाराष्ट्रातील सह्याद्री-सातपुड्यातील पर्वत रांगावरचे गड किल्ले, उत्तर प्रदेश–मध्यप्रदेशची खवय्येगिरी, केरळमधील मनमोहक निसर्गरम्य समुद्रकिनारा, दक्षिण भारतातील देवालये, कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंदाचे स्मारक ही आणि अशी अनेक पर्यटन स्थळे भारतभर विखुरलेली आहेत. भारतातील पर्यटन हे सामाजिक जीवनाच्या अगदी आसपास परिणाम करणारे असे आहे. किंबहुना म्हणूनच त्याची अर्थी बाजू अत्यंत महत्वाची आहे. फिरल्याने आपल्याला अनेक गोष्टी कळतात. आपल्या नवीन आपल्याला नवीन स्थळांची माहिती मिळते. आपल्या ज्ञानात भर पडते. एक नवीन प्रवास एक नवीन अनुभव देऊन जीवन समृद्ध करण्यात उपयुक्त ठरत जातो. घराबाहेरच्या जगामध्ये आपण स्वतःचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व नव्याने घडवू शकतो. स्पर्धांमध्ये एकात्मतेची सांगलीत कार्याचे आणि मैत्रीचे बंध तयार करण्यासाठी ची जाणीव निर्माण करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. हे जीवन सुंदर आहे हे अनुभवण्यासाठी आपण पर्यटन करायलाच हवे, हा झाला आवडीचा रसिकतेचा विषय मात्र एखाद्या देशातील प्रादेशिक विकास हा पर्यटन विकासावर आधारित असेल तर तो अधिक गतिशील रित्या विकसित होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रीलंका सारखा छोटा देश जो केवळ पर्यटनाच्या जोरावर आपला विकास साधत आहेत. त्याचप्रमाणे भूतान नॉर्वे फिनलंड सारखे देश सुद्धा पर्यटन व्यवसायात आपली प्रतिमा तयार करत आहेत. हे देश राष्ट्रीय उत्पन्नासाठी पर्यटन व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतात. हा दृष्टीकोण आपल्यालाही विकसित करायचा आहे, हे लक्षात घ्यावे. जागतिक वारसा टिकविण्याच्या दृष्टीने असे जगभरातून शास्वत विकास व व्यवसायिक पर्यटन ह्याचे सांगड घातली जाते तसेच सांगड भारतालाही पर्यटन व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून सबल करण्यासाठी करायला हवा.
पर्यटन क्षेत्राला विकासाचे इंजिन म्हणावे म्हणायला हवे खरेतर. पर्यटनातून रोजगार क्षमता निर्माण होते, विकास होतो, पायाभूत सेवा-सुविधा तयार करता येतात. आर्थिक जडणघडण घडते. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवीन वाटा तयार होतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या व्यवसायिक दृष्टिकोनातून होणारे फायदे विचारात घ्यायला हवेत. या क्षेत्राचा विकास केवळ प्रशासनावर अवलंबून नाही तर खासगी गुंतवणूकदार सामाजिक संस्था तसेच बिना सहकारी संस्था देखील संस्कृती व वारसा यांचे जतन या माध्यमातून सहज करू शकतात. भारताकडे अमाप संस्कृती आणि वारसा वास्तू उपलब्ध आहेत याचे जतन होणे नितांत गरजेचे आहेत यासाठी सप्तसूत्री कार्य करू शकतो. स्वागत, सूचना, सुविधा, सुरक्षा, सहयोग, संरचना, सफाई, आणि सहयोग या सात सूत्रांचा अवलंब करून पर्यटन विकास फुलविणे शक्य आहे.

टिप्पण्या