आर्थिक संकटात शोधा नव्या संधी ...!
देशात सर्वत्र कोविड -१९ या महामारीने हैराण केले असताना हा लेख प्रपंच करण म्हणजे माझ्यातील अभ्यासकाला जे दिसतंय हे तुम्हा सर्वाना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न .... परवा झाले असे की, माझी मुलगी youtube वर गोष्टी बघत बसली होती. त्या गोष्टीतील एक लहान मुलगा फक्त डोसाच खात असतो ....नाही केला तर उपाशी राहतो ...यामुळे आपल्या मुलाला चांगले दिले पाहिजे या विचाराने त्याची आई त्याला सर्व भाज्यांचे डोसे बनऊन देते. असे करत करत तो मोठा होतो. अभ्यासात जेमतेम असतो त्यामुळे पुढे नोकरी शोधायला जातो तेव्हा त्याचे मित्रं मोठ्या पदावर गेलेले असतात आणि त्याची गंमत करतात. त्याला चिडवतात, त्यमुळे तो नाराज होऊन घरी येतो. खिन्न आणि चिंताग्रस्त मुलाला आई विचारते की काय झाले? त्यावेळी तो घडलेला प्रकार आईला सांगतो .... मग त्याच्या डोक्यात कल्पना येते कि , छोट्याश्या हातगाडीवर डोसा तयार करायचा आणि तो विकून स्वताच्या पायावर उभे राहायचे आणि हसणाऱ्या त्याच्या मित्रांना उत्तर द्यायचे . ते हि आपल्या कामातून ... तो उद्योग सुरु करतो, इतक्या विविध प्रकारचे डोसे बनवू लागतो कि ज्यामुळे काही वर्षत तो चा...