आर्थिक संकटात शोधा नव्या संधी ...!

 देशात सर्वत्र कोविड -१९ या महामारीने हैराण केले असताना हा लेख प्रपंच करण म्हणजे माझ्यातील अभ्यासकाला जे दिसतंय हे तुम्हा सर्वाना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न .... परवा  झाले असे की, माझी मुलगी youtube वर गोष्टी बघत बसली होती. त्या गोष्टीतील एक लहान मुलगा फक्त डोसाच खात असतो ....नाही केला तर उपाशी राहतो ...यामुळे आपल्या मुलाला चांगले दिले पाहिजे या विचाराने त्याची आई त्याला सर्व भाज्यांचे डोसे बनऊन देते. असे करत करत तो मोठा होतो. अभ्यासात जेमतेम असतो त्यामुळे पुढे नोकरी शोधायला जातो तेव्हा त्याचे मित्रं मोठ्या पदावर गेलेले असतात आणि त्याची गंमत करतात. त्याला चिडवतात, त्यमुळे तो नाराज होऊन घरी येतो. खिन्न आणि चिंताग्रस्त मुलाला आई विचारते की काय झाले? त्यावेळी तो घडलेला प्रकार आईला सांगतो .... मग त्याच्या डोक्यात कल्पना येते कि , छोट्याश्या हातगाडीवर डोसा तयार करायचा आणि तो विकून स्वताच्या पायावर उभे राहायचे आणि हसणाऱ्या त्याच्या मित्रांना उत्तर द्यायचे . ते हि आपल्या कामातून ... तो उद्योग सुरु करतो, इतक्या विविध प्रकारचे डोसे बनवू लागतो कि ज्यामुळे काही वर्षत तो चांगले रेस्टॉरंट काढतो. अश्या  पद्धतीने  तो कमवायला शिकतो आणि धनवान होतो. याचं तात्पर्य असे कि, खचून न जाता कार्य करत पुढे जावे , वाटा मिळत जातात... 
      सध्या जे निरुत्साहाचे वातावरण आहे ते आपल्याला कामापासून दूर करणारे आहे हे खरच आहे. मात्र तरीही काही नवीन योजनांचा जन्म याच किरीनाच्या काळात झाला आहे. भारतात आध्यात्मिक आणि विविध कलांना चांगला वाव असल्याने आणेल भरत काम आणि कलाकुसर यावर आधारित जुने उद्योग नवीन रुपात आपल्याला दिसत आहेत. नोकरी करत असून देखील काही लोकांनी या काळात आपल्यातील निद्रिस्त कला जागृत केल्या आहेत. माझ्या काही मैत्रीणीनी रांगोळीचे शिकवण्या घेतल्या. फुलांच्या रांगोळ्या हा उपक्रम कौतुकास्पद ठरला...काहींनी रंग काम करून मनातील सर्व चैतन्य त्यात उतरवले...काहीनी आपले वाचन वाढवले,   काहींनी लिखाण केले... मुलांनी बुकमार्क तयार केले आनंदाने ....अनेक नवीन कविता उदयास आल्या...आम्ही तर  कमी अंतरावरचे राहून गेलेले डोंगर फिरून आलो...खाद्यसंस्कृतीचे तर खावे तितके नमुनेदार पदार्थ खाण्यात आणि खायला घालण्यात मजा आली... आणि नव्या उत्साहाने कामाला लागलो... काहीतरी काम करण्यात स्वतः ला गुंतवून ठेवणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. आता बोलूया की बाजारपेठेत नवीन आले यावर....
      देशात या काळात आपल्याकडे खूप बाजारपेठा सजलेल्या असतात, किंबहुना तसे पाहण्याची आपल्याला सवय लागली आहे. श्रावणातल्या सणांची रेलचेल... फुलांची दुकाने ... शोभिवंत वस्तू ...असे वातावरण किरोनामुळे आपल्याला दिसत जरी नसले तरी शेती mart तयार होत आहेत. छोटे -छोटे शेतकरी आपला ताजा भाजीपाला व दूध या काळात ग्राहकांच्या दारी पोहोचवत आहेत. हा एक नवीन उद्योगातील  बदल आहे. घरी राहून महिला अनेक वस्तूंची खरेदी-विक्री करत आहेत. हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने घरगुती पद्धतीचे जेवण बनवून देत आहेत... बांबूच्या वस्तूही घरच्या घरी बनवत आहेत... अनेक विणकाम ,भरतकाम , गोधड्या शिवणे असे नव्या संकल्पनासह उद्योग सुरु आहेत. अनेक प्रकारचे मास्क (मुख-पट्ट्या) तयार होत आहेत. त्यातील नमुने अगदी कौतुक करण्यासारखे आहे. हात धुण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती औषधे बनवत आहेत.ते वेगवेगळ्या सुगंधी द्रव्यांपासून तयार करण्याचे उद्योग नव्याने जन्माला येत आहेत. अशी   कितीही संकटे आली तरी जगाला त्यतून मार्ग काढावा लागेल... त्यासाठी अनेक शास्त्रज्ञ झटत आहेत.... अर्थशास्त्रात मानवी संसाधनाला अधिक मह्त्व आहे. हेच आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचे आहे.
     मानव हानी होत आहे या कोरोना महामारीमुळे ....ज्यांना सुरक्षित राहायचे आहे त्यांनी आपआपल्यापरीने काळजी घेणे हेच यावर सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे अबाल वृद्धांनी स्वतःची काळजी घेणे गरजेची आहे. बचतीची सवय नसेल तर लावून घ्या. बचत करून खर्च करा.... योग्य त्या कामासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे....कोरोनामुळे घरी राहून तंत्र ज्ञानाच्या आधारे व्यापार करावा लागणार आहे. सावध रहा ....सुरक्षित व्यवसाय करा ... डीजिटल व्यवहार करा...नगद मूल्य कमीत कमी हाताळावे....ऑनलाइन व्यापारासाठी प्रयत्नशील राहावे....अंतर राखून आणि प्रशासकीय नियम पाळून काम करत राहावे..हेच सांगू इच्छिते.

कार्यमग्न रहा ...सुरक्षित रहा... 

पुढच्या लेखात आणखी काही नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूच ...!

प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका...☺☺☺

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Hi Madhuri...khupach chhan lihile ahes...keep up the great work...all the very best...
Dr. Jai Suryavanshi म्हणाले…
Very realistic and inspiring
Keep it up👍👍