खुणावणऱ्या बाजारपेठा
काही वेळा तर खास ठिकाणी बाजारपेठ नव्याने तयार करून सजवल्या जातात. भिन्न प्रकारच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्कॉउंटचा वर्षाव केला जातो. भारतात आणेल परंपरा आणि प्रादेशिक रूढी पूर्वापार चालत आल्या आहेत. त्यामुळे भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक रूढींना एक महत्त्वाचे स्थान आहे . त्यामुळे अर्थव्यवस्थेत रॊजगार निर्मितीचे एक महत्त्वाचे मध्यम म्हणून उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना सनांचे व उत्सवांचे अर्थकारण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंगभूत घटक आहे असेच म्हणावे लागेल. भारतात संस्कुतिक आणि धर्मिक रूढींना देशाच्या राज्यघटनेने मान्यता दिली आहे. भारतात राज्यसभेने ५१ उत्सवांना मान्यता दिली आहे त्यातील उत्सव हे राष्ट्रीय सन म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आपल्याकडे रूढी आणि परंपरा आणि वारसाने चालत आलेल्या अनेक गोष्टींना अप्रत्यक्ष लोकमान्यता आहे. हि लोकमान्यताच आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवत असतात . अशा वातावरणात अनेक उत्सवांमध्ये घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते हे निरनिराळ्या माध्यमातून ग्राहकांच्या प...