पर्यटन उद्योजकता : कास विकासाची (भाग १)
पर्यटन उद्योजकता :- कास विकासाची पर्यटन उद्योजकता - कास विकासाची पर्यटनाला जवळच्या शब्द शोधायला गेले की मुशफिरी भटकंती अनवट वाटा पायवाटा शोधणे, जंगल सफारी, गड किल्ल्यांची भेट, निसर्गरम्य प्रवासी सफरी व प्रेक्षणिय ठिकाण अशा अनेक शब्दांनी मनात गर्दी करायला सुरुवात केली . छंद, आवड, फुरसत म्हणून पर्यटनाला जाणे हे आजकाल नवीन आहे का? मुळीच नाही. पण असा साधा सरळ भटकायला प्रेरित करायला करणारा प्रवास आपल्याला जर आर्थिक गणितात बसवायचा झाल्यास विचार करायला हवा …! अगदी बरोबर ओळखलत...! देशाच्या संपन्न समृद्ध असलेल्या अशा प्रेक्षणीय स्थळांना पर्यटन म्हणून लौकिक मिळायला हवा. आज २७ जुलै जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्ताने थोडेसे जाणून घेऊ भारतीय पर्यटनाविषयी... ज्या पर्यटन स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे त्या स्थळांचा छोटासा अभ्यास विचार करू इच्छिते. भारताचा विचार केला तर प्राचीन शिल्पकला, स्थापत्य यांनी ओतप्रोत भरलेली आकर्षक मंदिरे आहेत. बौद्ध व जैन संस्कृतीच्या खाणाखुणा दाखवणाऱ्या अनेक दु...