डॉ. इशर... एक हिरा...!
डॉ. इशर जॉर्जे अहुलुवालिया या ख्यातनाम अर्थतज्ञ होत्या. या वर्षी आपण जे उत्तम हिरे गमावले त्यात हाही एक अजोड हिरा हरवला.यांनी ज्या संस्थंमध्ये काम केलं त्या संस्था आता नावाजलेल्या स्वरूपात आहेत. यांनी केलेल्या आर्थिक विचारमंथनात शहरीकरण आणि शिक्षण या दोन बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) या संस्थेच्या त्या अध्यक्ष पदी कार्यरत होत्या. १५ वर्षांचा असा प्रदीर्घ काळ त्या या संस्थेत काम करत होत्या. त्यांनी केलेल्या शिक्षण व साहित्यातील योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मॉन्टेकसिंग अहुलुवालिया यांच्या नावाचं मोठं वलय असूनही आपल्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.
Industrial Growth in India: Stagnation Since the Mid-सिक्सटीएस(1986) आणि Productivity and Growth in Indian Manufacturing (1992)
हि औद्योगिक अर्थशाश्त्रातील भरीव पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तसेच शहरीकरणावरही दोन पुस्तके लिहिली आहेत. ती म्हणजे Transforming our Cities: facing up to India's Growing Challenges: Postcards of Change (2014)आणि Urbanization in India:Challenges, opportunities and the way forward (2014). भारतातील महिला अर्थ तज्ञांपैकी उत्तम अकॅडेमिक रेकॉर्ड असणाऱ्या डॉ. इशर जॉर्जे अहुलुवालिया सदैव एक प्रेरणास्थान राहतील यात शंका नाही.
यावर्षी त्यांचं Breaking Through(2020) हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. यात अर्थशास्त्रातील carrier opportunities आणि व्यवस्थापनाच्या अनेक क्लुप्त्या विशद केल्या आहेत.
अशा या महान व्यक्तीला वंदन करून नवीन संकल्प करत सरत्या covid -१९ या विषाणूमुळे त्रासलेल्या या वर्षाला आता विराम देऊ.
नवीन वर्षात नवीन विषय मांडूच ...!
प्रतिक्रिया द्यायला विसरू नका .


टिप्पण्या